¡Sorpréndeme!

अरे बापरे खरंच कोणाला ६५४ कोटी पगार असू शकतो | International News | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

आयफोन बनवणाऱ्या अॅपल या कंपनीने उत्पन्न व निव्वळ नफा या दोन्ही गोष्टींमध्ये चांगली कामगिरी केली असून त्याचे प्रतिबिंब या बोनसमध्ये उमटले आहे.
कुक यांना निव्वळ पगार आणि बोनस असं दोन्ही मिळून एकूण वार्षिक मानधन १०२ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ६५४ कोटी रुपये इतके मिळाले आहे. कंपनीने एस अँड पूर ५०० या निर्देशांकामध्ये असलेल्या अन्य स्पर्धक कंपन्यांपेक्षा चांगली कामगिरी केली तर अॅपलच्या अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ होते. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव बघता, अॅपलची कामगिरी अन्य स्पर्धक कंपन्यांपेक्षा सरस होत आहे, आणि कंपनीचे अधिकारी जास्त मानधन घेत आहेत.या आधी २०११ मध्येही कुक यांनी अशीच चमकदार कामगिरी केली होती. त्यावेळी अॅपलनं एस अँड पूर ५०० या निर्देशांकामधल्या दोन तृतीयांश कंपन्यांना मागे टाकले होते, त्यामुळे कुक यांना ५,६०,००० शेअर्स विशेष बक्षीस म्हणून देण्यात आले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews